हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 26 जानेवारीला श्रीनगरमध्ये समाप्त होणार आहे. या यात्रेनंतर काँग्रेस ‘हाथ से हाथ जोडो’ (Haath Se Haath Jodo) अभियान सुरू करण्याच्या तयारीत आहे. यातून काँग्रेस भारत जोडो यात्रेचा संदेश पुढे नेणार आहे. ‘हाथ से हाथ जोडो’ या मोहिमेचे नियोजन व त्याची अंमलबजावणी करण्याची कवायत काँग्रेस नेतृत्वाने सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक राज्यासाठी एका नेत्याची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविली आहे.
26 जानेवारी पासून काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभियान सुरु होणार आहे. या मोहिमेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कर्नाटकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. अत्यंत हुशार आणि स्वच्छ चारित्र्य असलेले पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले होते. त्यांच्याव्यतिरिक्त, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांना छत्तीसगडचे प्रभारी, तर उत्तर प्रदेशचे काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य प्रमोद तिवारी यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. महाराष्ट्राची जबाबदारी एम एम पल्लम राजू यांच्यावर सोपंवण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्राकाश्मीर पर्यंत जाणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी थेट जनतेमध्ये मिसळत आहेत आणि लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एक नवीन राहुल गांधी पाहायला मिळाले आहेत.