कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच “सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले यांच्या नंतर मला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली व आता जिल्ह्याच्या चौथ्या सुपुत्राला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. शिंदे यांच्या हातून राज्याचा धोरनात्मक विकास होईल,” अशी आशा चव्हाण यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ विधीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र यांनी काल शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले व मी स्वतः मुख्यमंत्रीपद भूषवले.
तसेच राज्याच्या विकासाला गतीही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद मिळाले, याचा जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने मला मनस्वी आनंद आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातून धोरणात्मक विकास होईल, अशी आशा व्यक्त करतो.
राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्यात पुन्हा शिंदे व फडणवीस सरकार आले आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून सर्वांना एकच धक्का दिला. त्यानंतर आता राजकीय व्यक्तींकडून शिंदे व फडणवीसांचे अभिनंदन केले जात असून प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.