नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील कल हळूहळू समोर येत आहेत. एनडीए पुढं जात असली तरी जेडीयु पेक्षा भाजपच्या जागा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. याच मुद्द्यावर बोट ठेवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणल आहे .

लोजपाला वेगळ लढायला लावून नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला असा दावा त्यांनी केला. तसेच आमची अपेक्षा मागील जागांपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा होती. काँग्रेस हा राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र त्यात यश येताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सभांचा उपयोग वातावरण निर्मिती करण्यासाठी होतो. राजकारण बदलेलं आहे. मोठ्या सभा झाल्यातरी लोकं प्रभावित होते, असं वाटत नाही. आघाडी करुन लढतो तेव्हा स्थानिक लोकांचा निर्णय असतो. 75 टक्के मतांची मोजणी व्हायची आहे. यानंतर सप्ष्टपणे बोलता येईल, असंही चव्हाण यांनी सांगितले.

यापूर्वी छगन भुजबळ यांनी केला होता हा दावा

आपल्याच मित्रपक्षाला संपवण्याचा भाजपच्या प्रयोगामुळे नितीशकुमाराना फटका बसला असा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला होता. प्रत्येक राज्यात एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि त्याच पक्षाला नंतर संपवायचं हा भाजपचा नेहमीचा प्रयोग राहिला आहे. तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. त्याचाच फटका नितीशकुमार यांना बसला आहे, असा दावा भुजबळांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment