कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
किरपे ता. कराड येथील माजी सरपंच व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब देवकर यांची कराड तालुका भाजपच्या उपाध्यक्षपदी निवड झाली या निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देवकर यांना देण्यात आले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुल भोसले , जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, कराड तालुका अध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, शिवाजीराव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, भाजप हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे भाजपला भविष्यकाळात तळागाळापर्यंत संघटना बांधणीसाठी व मजबूत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन पूर्व काम करावे .लोकांच्या अडी-अडचणी जाणून घ्यायला ग्रामपंचायत स्तरावरून मंत्रालयापर्यंत कोणतेही काम थांबू नये यासाठी नियोजन पूर्व काम करावे
यावेळी अंकुश देवकर, बाजीराव शेवाळे, रमेश देवकर, आबासाहेब देवकर, कृष्णत माने, सुरेश देवकर, महेश देवकर, मनोहर सुतार, जयवंत देसाई, सतीश माने, सुभाष माने, संभाजी देवकर, महेश देवकर, एकनाथ देवकर, अमोल माने, संदीप माने, अमृत देवकर, राजेंद्र देवकर, विकास देवकर यांची उपस्थित होती.