अदानी आणि नरेंद्र मोदी यांची देश लुटण्यासाठी मैत्री; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । कराड प्रतिनिधी

“देशात मनमानी कारभार चालला आहे. देशातील वित्तीय संस्था रक्तबंबाळ झालेल्या आहेत. त्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष नाही. मोदी मित्रहो म्हणतात ते मित्र अदानी आहेत. गौतम अदानी व मोदी यांची पूर्व मैत्री होती. त्याचे रूपांतर देश लुटण्यामध्ये झाले”, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

कराड येथे काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थिती होते. यावेळी आ. चव्हाण म्हणाले की, गौतम अदानींच्या नऊ कंपन्यांना केंद्र सरकारच्या बँकांकडून मागेल तेवढे कर्ज द्या असे सांगण्यात आले. तुम्ही जर गप्प बसला तर बसला तर मोदी अजून मनमानी कारभार करतील. आणखी अदानी तयार होती. देशाला फार चिंबवून टाकतील, शोषण करतील. म्हणून आता जागरूक झाले पाहिजेदेशात एकच बाजू मांडायचे काम चालू आहे.

दुसरी बाजू येतच नाही. मोदींना देशातीळ बेरोजगार तरुणाचं काय होत आहे? भुकेल्या शेतकऱ्याचं, आत्महत्या करणाऱ्या गरीब शेतकऱ्याचं काय होईल यांच्याशी काहीही देणं- घेणं नाही. त्यांना फक्त आपल्या मित्राला वाचवायचं आहे. आणि म्हणून तर ते मित्रो असे म्हणतात. त्याचे खरे मित्र कोण असतील तर गौतम अदानी हे मित्र आहेत.

यावेळी सतेज पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, सरदार वल्लभाई पटेल यांचा गवगवा केला जात आहे. काँग्रेसनेही त्यांचा सन्मान केला. परंतु सरदार वल्लभाई पटेल यांनी आरएसएसवर बंदी घालावी, असे त्या काळात 4 फेब्रुवारीला सांगितले होते. हा इतिहास आहे. परंतु इतिहास बाजूला करण्याच काम सध्या सुरू आहे. आपल्यापुढे नवीन इतिहास आणला जात आहे, मात्र तो आनंद पाडण्याचं काम आपण करायचे असल्याचे पाटील यांनी म्हंटले.