हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एशियन गेम्स 2023 च्या महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताची युवा बॉक्सर प्रिती पवारने कांस्य पदक पटकावले आहे. त्यामुळे भारताच्या पदकसंख्येत अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. मुख्य म्हणजे, प्रीती पवारने पटकावलेल्या कांस्य पदकानंतर भारताकडे असलेल्या पदकाची संख्या 62 वर गेली आहे. प्रीती पवारने केलेल्या या कामगिरीमुळे आज तिचे संपूर्ण देशभरात कौतुक केले जात आहे.
एशियन गेम्स 2023 च्या दहाव्या दिवशी प्रिती पवारने महिला बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. प्रीती पवारने महिला बॉक्सिंग 54 किलो वजनी गटात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भारताकडे आणखीन एक कांस्य पदक येईल हे निश्चित झाले होते. सेमी फायनलमध्ये प्रीती पवारचा सामना चीनच्या चँग युआनसोबत होता. या सामन्यांमध्ये सचिनच्या बॉक्सरने प्रीतीचा 5 – 0 असा पराभव केला आहे. ज्यामुळे प्रीतीला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले.
🚨 Bronze Medal Alert 🥉🚨
Medal No.62 for India 🇮🇳
Preeti Pawar lost her Semi Final bout against Home favourite 🇨🇳 Yuan 0-5
Well Played Preeti 👏#AsianGames2022 #IndiaAtAsianGames pic.twitter.com/H1Jo6iiU4D
— The Khel India (@TheKhelIndia) October 3, 2023
दरम्यान, 19 वर्षांची प्रीती पवार ही एक दमदार बॉक्सिंग खेळाडू आहे. प्रीतीचे वडील आणि काका देखील बॉक्सिंग कोच आहेत. त्यांनी प्रीतीला देखील बॉक्सिंगसाठी प्रवृत्त केले. तसे बघायला गेले तर, प्रीतीला कधीच बॉक्सर व्हायचे नव्हते. ती अभ्यासात हुशार होती आणि परीक्षेतही तिचा नंबर येत होता. त्यामुळे ती असेच एखादे क्षेत्र निवडेल असे तिला वाटत होते. मात्र वडील आणि काकांमुळे प्रीतीला बॉक्सिंग आवडू लागले. हळूहळू प्रीती बॉक्सिंग क्षेत्रात उतरली. अखेर तिने आज भारताला कांस्य पदक जिंकून दिले आहे.
एशियन गेम्स 2023 च्या दहाव्या दिवसाची कांस्य पदकानेच सुरूवात झाली होती. याअगोदर पुरूष दुहेरी 1000 मीटर कॅनोई क्रीडामध्ये अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी भारताला कांस्य पदक पटकावून दिले. त्यानंतर आता प्रीती पवारने देखील कांस्य पदक पटकावले आहे. यामुळे भारताची पदकसंख्या 62 वर गेली आहे.