हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेनेकडून आता ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बँकेने व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. 19 सप्टेंबरपासून हे नवीन व्याज दर लागू झाले आहेत. आता 2 ते 10 वर्षांच्या कालावधीच्या आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे.
RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडूनही फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता जवळपास सर्वच बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याज दरात वाढ केली आहे. ज्याचा मोठा फायदा बँकांमध्ये एफडी करणाऱ्या ग्राहकांना होतो आहे. एफडी मध्ये सुरक्षित गुंतवणूकीबरोबरच चांगला रिटर्नही मिळतो. FD Rate
हे आहेत नवीन व्याजदर
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 2.50 टक्के ते 6.10 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना बँक 3 टक्के ते 6.60 टक्के व्याज देईल. तसेच आता ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के आणि 15 ते 30 दिवसांच्या एफडीवर 2.65 टक्के व्याज मिळेल. यासोबतच 31 ते 90 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के, 91 ते 179 दिवसांच्या FD वर 3.75टक्के, 180 ते 363 दिवसांच्या FD वर 5% आणि 364 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. FD Rate
6.10 टक्के व्याज
बँकेकडून ग्राहकांना 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर आधीप्रमाणेच 5.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. तसेच 390 दिवस ते 23 महिन्यांच्या FD वर, 6 टक्के, 23 महिन्यांपेक्षा कमी ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत FD वर 6.10 टक्के आणि 2 वर्षे ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.10 टक्के दराने व्याज दिले जाईल. यापूर्वी यावर 6 टक्के दराने व्याज दिले जात होते. FD Rate
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html
हे पण वाचा :
EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत खातेदाराला मिळतो 7 लाख रुपयांचा मोफत विमा, त्याबाबत जाणून घ्या
Vehicle Scrappage Policy म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या
Post Office च्या ‘या’ बचत योजनेमध्ये मिळतोय 7 टक्क्यांहून जास्त रिटर्न
FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज
Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त तर चांदीच्या किंमतीत वाढ; आजचे दर पहा