Privatisation- येत्या आर्थिक वर्षात ‘या’ दोन दिग्गज सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण होणार, सरकारने काय म्हटले ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खासगीकरणाच्या (Privatization) प्रक्रियेला आता वेग येत आहे. मोदी सरकार 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारी विमान कंपनी एअर इंडिया आणि ऑईल मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियमचे (Bharat Petroleum ) खासगीकरण करू शकते. सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी ही माहिती दिली आहे. 11 ऑगस्ट रोजी आयोजित Confederation of Indian Industries च्या वार्षिक अधिवेशनात बोलताना पांडे म्हणाले की,”17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या वर्षी आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे (PSU) खाजगीकरण होताना पाहणार आहोत.”

LIC चा IPO ही या वर्षी येईल
या व्यतिरिक्त, त्यांनी असेही सांगितले की, LIC चा IPO, जो भारतातील सर्वात मोठा IPO असू शकतो. तो या वर्षी येईल. 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, त्यातील बहुतांश खासगीकरण आणि LIC च्या IPO मधून होण्याची अपेक्षा आहे.

15 सप्टेंबरपर्यंत बोली मिळू शकते
एअर इंडियासाठी 15 सप्टेंबरपर्यंत बोली लावली जाऊ शकते, अशी माहिती आहे. अलीकडेच, केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी सांगितले होते की,” एअर इंडियासाठी बोली लावण्यासाठी इच्छुक संस्थांकडून (QIBs) 15 सप्टेंबरपर्यंत आर्थिक बोली येऊ शकतात.” त्यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्याच वेळी, वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, केंद्र सरकारने 27 जानेवारी 2020 रोजी एअर इंडियासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EIO) आमंत्रित केले होते. कोरोना विषाणूच्या साथीमुळे, यासाठीच्या वेळेची मर्यादा अनेक वेळा वाढवण्यात आली.