मुंबई प्रतिनिधी | राहुल गांधी यांच्या मुंबई येथील प्रचार सभेत प्रिया दत्त व्यासपीठावर उपस्थित होत्या.या सभेनंतर प्रिया दत्त पुन्हा एकदा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांची मनधरणी करण्यास काँग्रेसला यश आले आहे.
प्रिया दत्त यांना २००९ मधे उत्तर मध्य मुंबई या जागेवरून खासदारकी मिळाली होती, त्यामुळे २०१९ च्या आगामी निवडणुकीत त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची श्यक्यता आहे. २०१४ मधे काँग्रेसला या मतदार संघातून पराभव सहन करावा लागला होता, त्यावेळी पूनम महाजन या लढल्या होत्या. त्यामुळे यावेळी काँग्रेसला हा मतदारसंघ साथ देतो का हे पाहावे लागेल.
प्रिया दत्त यांनी मुलांची जबाबदारी असल्या कारणाने आधी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्या म्हणाल्या की, निवडणूक जिंकल्यावर फक्त जिंकून चालत नाही तर ५ वर्ष काम करावे लागते, नाहीतर मतदारांवर अन्याय केल्यासारखे होईल. आत्ता माझ्याकडे मुलांची जबाबदार असल्याने मी निवडणूक लढणार नाही असे त्यांनी सांगितले होते.
इतर महत्वाचे –
मावळमधे राष्ट्रवादीकडून ‘या’ लढणार ?