लखनौ प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत हालचालीला सुरुवात झाली आहे. पक्षात मोठा बदल करण्यात आला असून प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान प्रियांका गांधी यांनी मोदींविरोधात वाराणसीमधून लोकसभा निवडणुक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. आता वाराणसीपाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही अशीच मागणी केली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे त्यासंदर्भातील एक पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये मणिकर्णिकेच्या पोस्टरवर प्रियंका यांचा चेहरा लावण्यात आला आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ सिनेमाच्या पोस्टरवरच एडिटींग करुन हे पोस्टर तयार करण्यात आले आहे. या पोस्टवर ‘चारो तरफ बज रहा डंका, बहन प्रियंका… बहन प्रियंका’ आणि ‘देश की यही पुकार, काँग्रेस आऐ अबकी बार’ असे घोषवाक्यही या पोस्टरवर लावण्यात आले आहे .
या पोस्टर्समध्ये आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव होईल असंही लिहीण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये योगी अदित्यनाथ यांनी २०१७ साली मुख्यमंत्री पदासाठी खासदारकी सोडल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला होता हे आवर्जून नमूद करण्यात आल्याने आता यावर भाजपतर्फे काय प्रतिउत्तर येते य, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
इतर महत्वाचे –
कुर्दीश सौंदर्याला जेव्हा पराक्रमाची धार चढते