हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC : जर आपण कोणतीही पॉलिसी घेतली तर त्यासाठी कोणालातरी नॉमिनी बनवावे लागेल. कारण जर काही कारणास्तव पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला विम्याची रक्कम दिली जाईल. मात्र पॉलिसीधारकाने जरी नॉमिनीची निवड केली असली तरीही फक्त एकच नॉमिनी ठेवावा असा कोणताही नियम नाही. जर एखाद्याला हवे असेल तर त्याला आपल्या विमा पॉलिसीसाठीच्या नॉमिनीमध्ये बदल करता येऊ शकेल.
जर आपण LIC ची पॉलिसी खरेदी केली असेल आणि आपल्याला नॉमिनी बदलायचा असेल तर आता ते सहजपणे बदलता येईल. यासाठी आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी बनवता येईल. तर आजच्या या बातमीमध्ये आपण एलआयसीच्या पॉलिसीमधील नॉमिनी कसा बदलावा ते जाणून घेउयात…
नॉमिनी कोणाला बनवता येईल ???
हे जाणून घ्या कि, नॉमिनीची निवड फक्त पॉलिसीधारकालाच करता येतो. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर सर्व फायदे नॉमिनीलाच मिळतात. त्यामुळे आपल्या पॉलिसीचा लाभ ज्या व्यक्तीला द्यायचा असेल त्यालाच नॉमिनी करा. अनेक लोकांकडून आपल्या जोडीदाराला, मुलांना किंवा पालकांना नॉमिनी बनवले जाते. सहसा पॉलिसी घेतानाच नॉमिनी व्यक्तीची निवड केली जाते. मात्र, पॉलिसीधारकाला हवे असेल तर ते नंतर देखील करता येईल.
नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्या
विमा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान आपल्याला कधीही नॉमिनी बदलता येतो. तसेच यासाठी आधीच्या नॉमिनी व्यक्तीला याची माहिती देणे बंधनकारक नाही. यासाठी पॉलिसीधारकाला एलआयसीच्या फॉर्म 3750 मध्ये नोटीस पाठवावी लागेल. ज्यामध्ये, विमा पॉलिसीचा नॉमिनी म्हणून नियुक्त होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे तपशील द्यावे लागतील.
ही कागदपत्रे द्यावी लागतात
विमा पॉलिसीसाठीचा नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया फक्त ऑफलाइन पद्धतीनेच केली जाते. त्यासाठी अद्याप कोणतीही ऑनलाइन सुविधा उपलब्ध झालेली नाही. नॉमिनी बदलताना LIC चा फॉर्म 3750, एंडॉर्समेंटसाठी पॉलिसी बॉण्ड, पॉलिसीधारक आणि नॉमिनी यांच्यातील संबंधाचा पुरावा सादर करावा लागेल. त्याचप्रमाणे नॉमिनी बदलण्यासाठी, पॉलिसीधारकाला एलआयसीला कळवून कागदपत्रे सबमिट करावी लागतील. यानंतर कंपनीकडून पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/
हे पण वाचा :
MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ
IDFC First Bank ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
Multibagger Stock : अवघ्या 2 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
‘या’ ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Vivo T1 साठी दिला जातोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
आता WhatsApp वर मिळवा LIC पॉलिसीशी संबंधित प्रत्येक माहिती, घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ सेवा