IRCTC खाते आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC  : आजही लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यात प्राधान्य देतात. रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. हे लक्षात घ्या कि, तिकीट काउंटरवरून रेल्वेचे तिकीट खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तसेच दुसरीकडे बहुतेक लोकं ऑनलाइन तिकीट बुक करतात. मात्र जर आपण दर महिन्याला एकापेक्षा जास्त आयआरसीटीसी यूझर आयडीद्वारे ट्रेनचे तिकीट बुक करू इच्छित असाल तर आपले आधार कार्ड आयआरसीटीसी खात्याशी लिंक करावे लागेल.

IRCTC login: Here is how to smoothly access Indian Railways ticketing arm | Zee Business

वास्तविक, आधार लिंक न करता एका IRCTC युझर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 12 ट्रेनची तिकिटे बुक करता येतील. त्याच वेळी, आधार लिंक केलेल्या युझर आयडीद्वारे याहून जास्त म्हणजेच 24 तिकिटे बुक करता येतील.

IRCTC users can now book 12 tickets a month from single ID, know the process

अशा प्रकारे आपले IRCTC खाते आधारशी लिंक करा 

>> IRCTC ला आधारशी लिंक करण्यासाठी सर्वांत आधी http://www.irctc.co.in वर जा आणि येथे लॉगिन डिटेल्स भरा.
>> यानंतर MY ACCOUNT या पर्यायावर क्लिक करून Link Your Aadhar या पर्यायावर क्लिक करा.
>> आता आधार क्रमांक आणि व्हर्च्युअल आयडी इत्यादीं माहिती भरा.
>> यानंतर चेक बॉक्समध्ये जाऊन Send OTP चे बटण दाबा.
>> आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
>> त्यानंतर Verify बटणावर क्लिक करा आणि आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अपडेट बटणावर क्लिक करा.

Aadhaar-PAN linking online plan coming to IRCTC; will connect with login data of passengers to stop railways ticket book | Tech News
>> KYC पूर्ण झाल्यानंतर IRCTC लिंक होईल.
>> ईमेलवर कन्फर्मेशन लिंक आल्यानंतर लॉग-आउट करू शकता.
>> आपले स्टेटस देखील तपासू शकता.
>> आता आयआरसीटीसी वेबसाइटवर लॉग आउट करून आणि पुन्हा लॉग इन करून तिकीट बुक करू शकाल.

हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!