हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिनांक १८/१२/२०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता खरे ढेरे कॉलेज गुहागर येथे याच कॉलेजच्या संस्था चालक अध्यक्ष असलेल्या आरोपी महेश भोसले याने रोहन भोसले गुंडा मार्फत त्याच्या इतर ७ साथीदारां सह कॉलेज मधील प्राध्यापक असलेल्या ४ प्राध्यापकांवर सुनियोजित कटाने लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला असून, दोन प्राध्यापकांची प्रकृती गंभीर असून नागरी रुग्णालय रत्नागिरी येथे त्याचे उपचार सुरू असून इतर दोन प्राध्यापकांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे.
रोहन भोसले हा गुंड स्वतःला शिंदे गटाचा कार्यकर्ता व मंत्री उदय सामंत व आमदार भैय्या सामंत यांच्याशी जवळीक असलेल भासवून स्थानिक पातळीवर गुंडगिरी करीत असून आपल्या महिंद्रा थार या गाडीवर विधानसभा सदस्य असा स्टिकर लावलेला स्थानिकांद्वारे पाहण्यात आला होता. खरे ढेरे कॉलेज मध्ये बनावट परीक्षार्थी व बनावट गुणपत्रिका यांबाबत मुंबई विद्यापीठा मार्फत फॅक्ट चेकिंग नोटीस देण्यात आली या रागातून संचालकांनी हल्ला केला. असे मारहाण झालेल्या प्राध्यापक फिर्यादीनी जबाबात म्हटले आहे.
सदर घटना सकाळी ८ वाजता झालेली असून देखिल हा गुन्हा नोंद व्हायला रात्री ११:३० वाजले, गुन्हा नोंद करून घ्यायला स्थानकातील आयओ असलेले सोनवणे हे पोलीस अधिकारी टाळाटाळ करीत होते. व फिर्यादीनाच धमकावत असल्याबाबत धक्कादायक आरोप भुक्टोच्या प्राध्यापक संघटनांनी केली आहे. प्राध्यापक संघटना, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी ११:३० पर्यंत पोलीस स्टेशन परिसर सोडला नव्हता त्यामुळे गुन्हा नोंद होऊ शकला, असे उपस्थित स्थानिक सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी म्हटले. प्रा.गोविंद भास्कर सानप,प्रा. अनिल शशिकांत हिरगुंड,प्रा. निळकंठ सखाराम भालेराव, प्रा. संतोष विठ्ठलराव जाधव अशी हल्ला झालेल्या प्राध्यापकांची नावे आहेत.
सर्व गुन्हेगारांवरती अटेन्प्ट टू मर्डर ही केस दाखल झाली पाहिजे व गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सोनवणे या पोलीस अधिकारी चौकशी अंती निलंबण झाल पाहिजे व खरे ढेरे कॉलेज मधील संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊन तत्काळ सर्व आरोपीना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी गुहागर तहसीलदार कार्यालयावर प्राध्यापक पालक व विद्यार्थी यांचा मोर्चा काढण्यात येण्याबाबत निवेदन प्राध्यापक संघटनांनी गुहागर पोलीस स्थानक व तहसीलदार गुहागर यांना देण्यात आल आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेल नसून, सर्व आरोपी फरार आहेत. अशी माहिती स्थानिक पोलीस स्थानकातून प्राप्त झाली.