आता एका क्लिकवर भरता येणार मालमत्ता कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – नागरिकांना आता एका क्लिकवर मालमत्ता कर भरता येणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘नागरिक मोबाईल ॲप’ तयार केला आहे. त्याच बरोबर नागरिकांना त्यांच्या समस्यांची नोंद देखील या ॲपच्या माध्यमातून करता येईल. २६ एप्रिलपासून हे ॲप नागरिकांच्या सेवेत येणार आहे.

शहरातील मालमत्तांचे आणि नळ जोडण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख ८० हजार मालमत्तांचे आणि एक लाख वीस हजार नळ जोडण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते अपलोड करण्यात आले आहे. त्याशिवाय महापालिकेचा कारभार पेपर लेस व्हावा, यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. या कामासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मदत घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट नागरिक मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी ॲपवरील तिसरे बटन काम करणार आहे. नागरिकांच्या तक्रारी-अडचणींची नोंद करण्यासाठी देखील ॲपवर एक स्वतंत्र बटन देण्यात आले आहे.

मालमत्ता कर, पाणीपट्टी बद्दल माहिती मिळणार –
ॲप मधील एका बटनावर क्लिक करुन नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराबद्दल आणि पाणीपट्टी बद्दल माहिती मिळणार आहे. त्याच बरोबर क्लिक केलेल्या बटनाच्या आधारे कर देखील भरता येणार आहे. महापालिकेतर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि या सेवांचा लाभ घेण्यासाठी ॲपवर दुसरे बटन देण्यात आले आहे.

Leave a Comment