सोलापूर प्रतिनिधी | शिवाजी चौकातील विश्व्यमिलिंन लॉज या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारला आहे. या लॉजचा मालक सुरज आवसेकर, हॉटेल मॅनेजर राहुल मल्हारी सोनकांबळे, लॉजमधील हेल्पर मल्लिनाथ विभूते व लॉजचा सफाई कामगार सोपान पांडुरंग लांबतुरे हे कुंटनखाना चालवत असल्याची गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकुन चार जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी स्टँड परिसरातील विश्वमिलन लॉजमध्ये बेकादेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून या माहितीची खात्री केली. त्यानंतर गुरुवारी दुपारी लॉजवर धाड टाकण्यात आली.
यावेळी लॉजवर असणाऱ्या सहा पीडितांची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर, बंडगर, काळे, इनामदार, मुजावर, मोरे, मंडलिक व भुजबळ यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’