नवी दिल्ली | देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळापूर्वी आंदोलक शेतकर्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करुन आपला झेंडा फडकवला होता. आता तर एका आंदोलनकर्त्याने थेट लाल किल्ल्याच्या कळसावर चढून झेंडा फडकवलाय.
Delhi: One of the protestors puts flags atop a dome at Red Fort pic.twitter.com/brGXnpkFiP
— ANI (@ANI) January 26, 2021
आज दिल्लीत शेतकरी आणि पोलिस यांच्यात अनेक ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले. अशात आता शेतकर्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करुन पिवळ्या रंगाचा झेंडा फडकवल्याने हे आंदोलन चिखळण्याची चिन्हे आहेत.
अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. नव्या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेल्या शेतकर्यांनी आज राजधानीत प्रवेश करत ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अनेक ठिकाणी पोलीस व शेतकरी यांच्यात संघर्ष होत आहे.