सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
अधिकारी म्हणतो प्रांत मुंबईला गेले, तहसिलदार म्हणतात प्रांत आजारी पडले मंत्री शंभूराज देसाई म्हणाले चाैकशी लावा अन् खुलासा करा. खंडाळा तालुक्यातील विंग येथे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दाैरा काल होता. मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यक्रमाला खंडाळा तालुक्याचे प्रातांधिकारी अनुपस्थित नव्हते. यावरून मंत्री श्री. देसाई यांना वेगवेगळी उत्तरे मिळाल्याने ते चांगलेच भडकले अन् त्यांनी भरसभेत अधिकाऱ्यांच्या चाैकशीचेच आदेश दिले.
विंग येथे आयोजित कार्यक्रमात शंभूराज देसाई म्हणाले, जे अधिकारी गैरहजर असतील त्यांना नोटीस काढायला कलेक्टरांना सांगा. सामान्य जनतेचे, शेतकऱ्याचे काम आहे. एक अधिकारी आजारी पडतो, एक अधिकारी गैरहजर राहतो ते चालणार नाही. सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे, लोक सहा वाजले तरी थांबले आहेत. त्यामुळे जे कोणी अधिकारी गैरहजर असतील त्यांना खुलासा करावा लागेल. मला प्रांत मुंबईला गेल्याचे सांगितले, तहसिलदार म्हणतायत आजारी पडले आहेत. नक्की खरं कोण बोलतयं. यावर तहसिलदारांनी मुंबईला पण गेले अन् आजारी पण पडले असल्याचे म्हणताच. तुम्ही वकील असल्याचे म्हणताच लोकांच्यात हशा पिकला.
https://www.facebook.com/watch?v=869976580880589
लोकांच्यासाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे जागेवरच काम झाले पाहिजे. लोक खंडाळ्यात कार्यालयात जायचे अन् तिथे अधिकारी नसायचा, म्हणजे लोकांचा नुसताच हेलपाटा होणार. तेव्हा अधिकाऱ्यांनी लोकांसाठी काम करावे, असा सज्जड दमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिला.