पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोरोना लस; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड:- कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यात आज माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटे पेक्ष्या मोठी आहे. आता तरी शासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कोरोनाचे नियम जनतेने पाळावे. असे आवाहन त्यांनी यावेळी राज्याच्या जनतेला केलं.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत त्यांचे बंधू अधिकराव चव्हाण आणि त्यांचे केअर टेकर नामदेव चन्ने अशा तीन जणांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर त्यांना 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल. यावेळी आ. चव्हाण यांच्यासोबत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटे पेक्ष्या मोठी आहे. आता तरी शासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कोरोनाचे नियम जनतेने पाळावे. सामाजिक अंतर ठेवावे आणि मास्क तर सर्वांनी घालावेच असे म्हणत 45 वर्षांवरील सर्वांनी कोरोना लस घ्यावी अस आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. तसेच राज्याने जो लसीचा साठा मागवलेला आहे तो केंद्राने पर्याप्त प्रमाणात द्यावं अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment