औरंगाबाद : पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आता लगद्यांच्या विटांचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संबंधी महापालिकेने निविदा काढली होती, चार वेळा निविदा पत्र काढूनही फक्त एका कंपनीने या निविदा पत्राला प्रतिसाद दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने विद्युत दहनी सुरू केली होती, मात्र अनेक कुटूंबीयांची विद्युत दहन अंत्यसंस्काराची मानसिकता नाहीये. अंत्यसंस्कारासाठी आताही शंभर टक्के लाकडांचा उपयोग केला जात आहे याने पर्यावरणचा ऱ्हास होत आहे. महापालिकेने शहरातील एकूण चार स्मशानभूमीत गॅस दहिनी बनवण्याचे कार्य सुरू केले आहे.
लाकडांचा वापर न करता लगद्यापासून तयार केलेल्या विटांचा वापर करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. कंपनीने लगद्यांच्या विटांचे नमुने महापालिकेला सादर केले आहेत. विटांच्या नमुन्यांची तपासणी पुण्यात केली जाणार असून, अहवाल मिळाल्यानंतर कार्य सुरू होईल अशी माहिती मिळत आहे.