Pune Accident : टेम्पो- कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 3 जण ठार

Pune Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात एक भीषण अपघात (Pune Accident) घडल्याची घटना समोर येत आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे मधील तोडकवस्ती येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात (Car Tempo Accident) झाला. या अपघातात ३ जण जागीच जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

नेमका कसा घडला अपघात ?

तळेगावातील ढमढेरे येथील तोडकवस्ती येथून कविता बोरुडे आपल्या परिवारासोबत कारमधून जात असताना अचानक समोरून टेम्पो आला, आणि दोघांची समोरासमोर टक्कर झाली. अपघात एवढा भीषण होता की, कार आणि टेम्पोचा कागदाप्रमाणे चूरगळा झाल्याचे दिसून येत आहेत. या अपघातात ३ जण मृत पावलेले असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. कविता बोरुडे (वय 40 वर्ष) योगिता बोरुडे (40 वर्ष) आणि कारचालक राजू शिंदे (25 वर्ष) असे ३ मृत व्यक्तींची नावे आहेत. तर किशोरी बोरुडे (वय 17 वर्ष ) श्रीराम बापूराव मांडे आणि धीरज लोखंडे गंभीर जखमी झाले असून तिघांचे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास करत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला हे अजून समोर आलेलं नाही. पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा केला असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच जे जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या.रुग्णालयात.दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.