पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद; महापौरांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून वीकेंड लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुणे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून बंद राहणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहे अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, जीवनावश्यक सेवा वगळून पुण्यातील सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. व्यापाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता, मात्र मुरलीधर मोहोळ यांनी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं उद्यापासून बंद राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.