Pune Aurangabad Expressway : आता फक्त 2 तासांत होणार पुणे ते औरंगाबाद प्रवास; या ठिकाणांवरून जाणार महामार्ग

Pune Aurangabad Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| औरंगाबादहुन पुणेला (Pune Aurangabad Expressway) जायचं म्हणजे अंगाला काटाच येतो. ह्या मार्गात मध्यन्तरी लागणार ट्राफिक खरंच खूप जीवघेण असत. त्यामुळे असं होऊन जात की नको हा प्रवास. पण थांबा आता हे म्हणण्याचे दिवस सरले. कारण हा जीवघेणा प्रवास आता केवळ 2 तासातच पूर्ण होणार आहे. हे शक्य झालंय केंद्र सरकारच्या एका योजनेमुळे. आता हीं योजना नेमकी काय आहे आणि हा महामार्ग कसा असेल ह्यावर्ती आपण एक नजर टाकुयात.

काय आहे ही योजना? 

केंद्र सरकारची भारतमाला परियोजना हा राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. यामध्ये सीमा आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी असलेल्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. बंदरे आणि रस्त्यांची सुधारणा, राष्ट्रीय कॉरिडॉर आणि नॅशनल कॉरिडॉरचा विकास यांचाही या प्रकल्पात समावेश आहे. याशिवाय मागास भाग, धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणारे राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पाअंतर्गत तयार केले जाणार आहेत. याच योंजनेअंतर्गत औरंगाबाद ते पुणे हा महामार्ग (Pune Aurangabad Expressway) होणार आहे.

औरंगाबाद ते पुणे प्रवास केवळ 2 तासावर 

औरंगाबाद ते पुणे सध्याच्या प्रवास पुर्ण करण्यासाठी जवळपास 4-6 तास लागतात.  परंतु या प्रस्तावित एक्सप्रेसवे मुळे औरंगाबाद ते पुणे प्रवास फक्त 2 तासात पुर्ण करण्यात येईल.

कसा आहे हा महामार्ग?  (Pune Aurangabad Expressway)

हा महामार्ग एकूण 250 km चा असून महामार्गची रुंदी 70 मीटर ची असेल. औरंगाबाद पासून सुरु होणारा महामार्ग अहमदनगर मार्गे पुणे शहरापर्यंत जाईल. महामार्गाच्या आजूबाजूला औद्योगिक विकासाला चालना मिळेल. औरंगाबाद व पुणे दोन्ही शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहेत. त्यामुळे ह्या भागात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा भविष्यात वाहताना दिसेल.

कोण कोणत्या ठिकाणावरून जाणार हा मार्ग?

औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बी.के., चिंचोली, घारदोन. पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, ववा, वरुडी बी.के., पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहांगीर, पाटेगाव, साईगाव, पैठण एमसी १ इथून हा महामार्ग जाणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील भोर तालुका,हवेली तालुका, पुरंदर तालुका,दौंड तालुका, शिरूर तालुका ह्या तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गावातून हा महामार्ग जाणार आहे.