वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात : पुणे -बेंगलोर महामार्गावर 1 ठार, 30 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा  प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बेंगलोर महामार्गावर शिरवळ (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. देहू -आळंदी येथून निघणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा जोरदार भीषण अपघात झाला आहे. आज रविवारी दि. 19 रोजी पहाटे 4 वाजता झालेल्या या अपघातात 1 वारकरी ठार तर 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  भरधाव वेगाने असलेल्या आयशर टेम्पोने कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथील दिंडी सोहळ्यातील ट्रँक्टर ट्राँलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मायप्पा कोंडिबा माने (वय 45, रा,भादोले ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मारुती भैरवनाथ कोळी (वय 40,रा.लाहोटे ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ) हे गंभीर जखमी आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील वारकरी पायी दिंडी सोहळा पंढरपूर पायी वारी करीता आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्याकरीता निघाले होते. शिरवळ हद्दीत ट्रँक्टर (क्रं- एमएच-10-ay-5705) ट्राँलीमधून प्रवास करीत होते. तेव्हा पाठीमागून तरकारी घेऊन पुणेकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (क्रं.एमएच-45-एएफ-2277) वरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या विदयुत खांबाला जोरदार धडक दिली. तसेच, महामार्गावरुन दिंडी सोहळ्याकरीता निघालेल्या ट्रँक्टर ट्राँलीलाही पाठीमागून जोरदार धडक दिली. हि धडक ऐवढी जोरदार होती की, ट्रँक्टर ट्राँलीच्या पाठीमागील ट्राँलीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघातातील 30 जणांची नावे पुढीलप्रमाणे 

अपघातामध्ये भादोले,लाहोटे येथील इंद्रजित पांडुरंग पाटील( वय- 50), बाळासो ज्ञानू तावडे, प्रमिला वसंत पाटील( वय -55), शिवाजी दत्तू सलगर( वय- 72), यशवंत सुराप्पा शिंदे (वय- 67), कृष्णात उर्फ बाप्पू यादव(वय- 55), शिवाजी माने(वय- 70), भिकाजी सखाराम माने ,महिपती महादेव पाटील (वय- 65),सचिन रामचंद्र नांगरे (वय- 36), शिवाजी यशवंत नांगरे (वय-70), आनंदा युवराज माने (वय- 45), रघुनाथ भैरु माने (वय-  48), शिवाजी धोंडिराम येडके (वय- 50), महादेव ज्ञानू पाटील (वय -65),रमेश राजाराम पाटील (वय- 57), शोभा नाना माने(वय40), वसंत लखु माने (वय 60),तानाजी राजाराम तावडे (वय- 47), विमल बाळासो तावडे (वय- 60), कल्पना पाटील (वय- 50), विलास आनंदा पाटील (वय-65) व इतर दोन वारकरी असे 30 वारकरी गंभीर तर अकरा वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच तातडीने शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, शिरवळ पोलीस स्टेशनच्या व सारोळा महामार्ग मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेवून मदतकार्य केले.