पुणे बंगळूर महामार्गावर ट्रकला आयशरची धडक; अपघातात ट्रक चालक जागीच ठार

accident on pune nashik highway car
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत मालट्रकला आयशर ट्रकची पाठिमागून धडक बसली. या भीषण अपघातात आयशर ट्रकचा चालक जागीच ठार झाला. रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुनिल संदिपान वाघमोडे (वय- 37, रा. शिवडे ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल वाघमोडे हे आयशर ट्रक (क्रमांक एमएच- 50 एन- 0798 ) घेऊन कोल्हापूरकडून कराडकडे येत होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत आला असता, त्यांचा ट्रकवरील ताबा सुटल्याने समोर सातारा दिशेने निघालेल्या मालट्रक (क्रमांक टी एन २८ बी बी १६६६) ला पाठिमागून धडक झाली.

या भीषण आपघातात ते स्टेअरिंगमध्येच अडकून पडल्याने जागीच ठार झाले. ही धडक एवढी भीषण होती की आयशर ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघात होताच आसपासच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. चालकाचा मृतदेह अडकून पडल्याने क्रेनच्या साह्याने तो बाहेर काढावा लागला. हायवे हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.