पुणे बेंगलोर महामार्गावर Swift कारचा टायर फुटला अन्…युवा उद्योजक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पुणे-बेंगलोर महामार्गावर आटके टप्पा येथे स्वीफ्ट गाडीचा पुढचा टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये पोतले (ता. कराड) येथील युवा उद्योजक जागीच ठार झाला. अपघातात ठार झालेल्या युवकाचे शरद चंद्रकांत पाटील (वय-33) असे नाव आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात स्वीफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोतले येथील शरद पाटील हा आपल्या आई- वडिलांना एकुलता एक मुलगा होता. सायंकाळी महामार्गावरून शरद पाटील व त्याचा मित्र स्वीफ्ट गाडीतून प्रवास करत होते. यावेळी गाडीचा टायर फुटल्याने गाडीने पलटी घेतली. यावेळी घटनास्थळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. परंतु यावेळी शरद पाटील हे जागीच ठार झाले होते. तर त्याचे सहकारी गंभीर जखमी झाले होते.

घटनास्थळावरील लोकांनी जखमीला कृष्णा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. जखमीचे रात्री उशिरापर्यंत अोळख पटविण्याचे काम सुरू होते. शरद पाटील यांच्या जाण्याने पोतले गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. अपघात ठिकाणी कर्मचारी पीएसआय जाधव यांनी भेट दिली तर पंचनामा मेघा साळुंखे यांनी केला आहे.