पुणे- बेंगलोर महामार्गावर ट्रॅक्टर- कारच्या धडकेत १ महिला ठार ४ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रॅक्टर- ट्रॉली व कारचा अपघात झाला. यामध्ये सविता शांतीनाथ बेडकीहाळे (वय 52, रा. भोज, ता. चिकोडी) ही महिला ठार झाली. तर चार जण जखमी झाले आहेत.

जखमीमध्ये वैभव अनंत बडबडे ( वय 45, रा. आकिवाट, ता. शिरोळ), सौ. सुनीता शीतल शिरहट्टी (वय 49, रा. तळदंगे, ता. हातकणंगले), सौ. संगीता संजय शिरगावे (वय 45, रा. इचलकरंजी) व पद्मजा अनिल सौन्दत्ती (वय 42, रा. भोज, ता. चिकोडी) यांचा समावेश आहे. या अपघाताची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

साईबाबा आमचेसुद्धा, राज्यभरातून नागरिकांची कोट्यवधी रुपये देण्याची मागणी

‘नाइट लाईफ’वर टीका करणारे प्रदूषित मनाचे; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अपघातात वाढदिवसादिवशीच तरुणाचा मृत्यू