हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे तिथे काय उणे असं म्हणतात तेच खरं… याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. वाचवा रे वाचवा …. ड्राइव्हर त्रास देतोय …. उतरून देत नाही अशी बोंब मारत पुण्यात एका बसमधील प्रवाशाने चांगलंच आकांडतांडव केलं. याबाबतचा एक विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं ?
बस मधून ऑफिसला निघालेल्या या प्रवाशाला ज्या स्टॉप वर थांबायचं होत तिथे त्याला उतरून दिले नाही असा आरोप सदर प्रवासी व्यक्तीचा आहे. त्यावरूनच त्याने थेट चालकाशी अरेरावी केली. मात्र आपण मघाशीच बस थांबवली होती तेव्हा उतरायला कळलं नाही का ? असा उलट सवाल चालकाने केला असता या प्रवाशाने मोठोमोठ्याने बोलायला आणि बोंबलायलाच सुरुवात केली.
https://www.instagram.com/reel/CjugZVhssos/?igshid=YmMyMTA2M2Y%3D
मला वाचवा… ड्राइव्हर त्रास देतोय.. वाचवा ड्राइव्हर किडनॅप करतोय असं मोठमोठ्याने म्हणत या प्रवाशाने ड्राइव्हरच्या नावाने बोंबा मारण्यास सुरुवात केली. त्याच्या या किंचाळ्या ऐकून आसपासच्या गाडयाही थांबल्या. रस्त्यावरून जाणारे नागरिकही हा सगळा प्रकार पाहून अचंबित झाले. बसमधील एका प्रवाशाने याचा एक विडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.