Monday, January 30, 2023

राणेंचा भास्कर जाधवांना इशारा; उरलीसुरली अब्रू 17 तारखेला काढणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आमच्यावर आकसापोटी गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. याबाबत भाजप नेते निलेश राणे यांना विचारलं असता त्यांनी यावरून भास्कर जाधव यांच्या वर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव ला आम्ही कार्टूनच म्हणतो, त्यांची उरलीसुरली अब्रू 17 तारखेला काढणार असा इशारा त्यांनी दिला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश राणे म्हणाले, भास्कर जाधव आणि विनायक राऊत ही बाद झालेली माणसे आहेत. मिमिक्री करण्याशिवाय ते दुसरं काय करू शकत नाहीत. भास्कर जाधव ला आम्ही कार्टूनच म्हणतो. आणि विनायक राऊत याना किती अक्कल आहे आम्ही सांगायची गरज नाही. 17 तारखेला आपण भास्कर जाधवच्या चिपळूण मध्ये जाहीर सभा घेऊन त्यांची उरली सुरली अब्रू काढणार असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला.

- Advertisement -

दरम्यान, संख्याबळ गेलं की हे सरकार पडेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं याचाही निलेश राणे यांनी समाचार घेतला. सगळीच सरकारे संख्यबळावर असतात. अजित पवार यांचा विरोधी पक्षनेते म्हणून प्रभाव पडत नाही, राज्यात विरोधी पक्षनेता आहे की नाही हेच कळत नाही म्हणून ते अशी वक्तव्ये करत असतात असा टोला निलेश राणे यांनी लगावला.