मोठी बातमी : पुण्यात ‘या’ वेळेत कडक संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी जाहीर; विभागीय आयुक्तांची माहिती

पुणे : पुणे शहरात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. उद्या ३ एप्रिल पासून हि संचारबंदी लागू होणार आहे. ३० एप्रिल पर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत असंही राव यांनी सांगितले आहे.

पुणे आणि परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निर्बंध वाढवण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर संचारबंदी आणि जमावबंदी पुढी सात दिवस लागू असणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले आहे.

दरम्यान, संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. आठवडाभर हॉटेल, रेस्टोरंट, बार बंद राहणार आहेत. मात्र होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे. नागरिकांनी उद्या ३ एप्रिल पासून याची अंबलबजावणी करण्याची सूचना राव यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –

 • देशात सर्वाधिक चाचण्या पुण्यात
 • बेड वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भर
 • लस घेण्याची प्रक्रिया आणि देण्याची प्रक्रिया देशात सर्वात जास्त
 • सध्या 57 हजारापर्यंत लस देण्यात येत आहे रोज तो एक लाखापर्यंत नेणार
 • पुण्यात लसीकरणाचा वेग वाढविणार
 • ४०० मेडिकल स्टाफची तातडीने भरती केली आहे
 • हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील 7 दिवसांसाठी बंद
 • Pmpl सेवा ही सात दिवसांसाठी बंद
 • आठवडा बाजार सात दिवस बंद
 • होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार
 • लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद
 • अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद
 • सर्व धार्मिक स्थळे बंद
 • दिवसा जमाव बंदी. रात्री संचार बंदी…
 • उद्याने सकाळी सुरू रहाणार
 • उद्यापासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणारं…
 • शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार. मात्र परीक्षा वेळेत होणार
You might also like