हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात एका १७ वर्षीय मुलीवर दोन सख्ख्या भावांनीच सलग १५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील उरुळी कांचन या परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. सध्या याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी रात्री मुलीची आई काही कारणासाठी बाहेर आली होती. त्यावेळी मुलगी खोलीत अभ्यास करत होती. यावेळी खोलीच्या बाहेर आरोपी आयुब बसला होता. यानंतर आईने आत जाऊन पाहिले तर त्याचाच भाऊ इरफान खोलीत होता. आईला पाहिल्यानंतर या दोघांनी बाहेर धूम ठोकली. यानंतर मुलीने आईला सर्वकाही घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार कोयत्याने आई वडिलांना मारुन टाकण्याचा धाक दाखवत हे दोन्ही आरोपी गेल्या १५ दिवसांपासून या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. मात्र आई वडिलांना मारुन टाकण्याच्या धमकीमुळे मुलीला काही सांगता आले नाही. हा सर्व प्रकार आईला समजल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
तसेच या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र या प्रकरणामुळे उरुळी कांचन मधील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेविरोधात उरुळी कांचनमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली आहे. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुलीच्या आईने केली आहे. आता या प्रकरणात महिला आयोगाने देखील हस्तक्षेप घेतला आहे.
उरुळीकांचन येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून वारंवार तिच्यावर दोन आरोपीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे,यामध्ये पोलिस आयुक्तांशी मी स्वतः चर्चा केली असता,पीडिता व आरोपी यांची अनेक दिवसांपासून ओळख होती ,CDR मध्ये हे सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 14, 2023
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल की, उरुळीकांचन येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून वारंवार तिच्यावर दोन आरोपीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिस आयुक्तांशी मी स्वतः चर्चा केली असता,पीडिता व आरोपी यांची अनेक दिवसांपासून ओळख होती. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच CDR मध्ये हे सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे.,आरोपीला अटक झाली असून POCSO ACT नुसार कडक कारवाई करण्यात येत आहे,राज्य महिला आयोगाकडून पाठपुरावा करण्यात येत असून पालकांनी देखील वयात येताना आपल्या पाल्यासोबतचा संवाद वाढवून त्यांना आत्मविश्वास द्यावा ,केवळ मुलींनाच नाही तर मुलांनादेखील संवादातून समुपदेशनाची मोठी गरज आहे असे चाकणकर यांनी म्हटले आहे.