येरवडा : हॅलो महाराष्ट्र – टेक महिंद्रा कंपनीतील एका टीम लीडरने आपल्या सहकारी तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तरूणीला स्पर्श करणे, वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करणे, घाणेरड्या कमेंट करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजमेंटने टीमलीडरवर कोणतीही कारवाई केली नाही. हि घटना येरवडा परिसरात घडली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टीमलीडरचे नाव संजय दास आहे. तसेच या कंपनीच्या मॅनेजमेंटविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये शिवी कालिया, माक डिसील्वा, हिमांशु शर्मा, इम्रान खान, निताश कुटी, हर्षवेंद्र सॉईन यांचा समावेश आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी तरूणी हि येरवड्यातील टेक महिंद्रा कंपनीमध्ये कामाला आहे. या ठिकाणी संजय दास हा तरूणीचा टीमलीडर आहे. संजय दास हा मार्च २०२० पासून तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तरूणीला स्पर्श करणे, वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करणे, तरूणीने घातलेल्या कपड्यांवर घाणेरड्या कमेंट पास करत होता. टीम लीडर असल्यामुळे तरूणीने काही दिवस हे सगळे सहन केले. यांनतर तरुणीने त्याची तक्रार कंपनीच्या मॅनेजमेंट केली पण मॅनेजमेंटने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास येरवडा पोलिसांकडून करण्यात येत आहे.