धक्कादायक ! तुझ्या पतीला प्रमोशन देणार नाही अशी धमकी देत विवाहितेवर बलात्कार

rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीला प्रमोशन न देण्याची भीती दाखवत पतीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोपीने या महिलेला आपल्या वासनेचे शिकार बनवले आहे. या बाबत ३५ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव सफदर अली खान असे आहे. तो कोंढवा बुद्रुक येथील आरयुफओरीया सोसायटी येथे राहतो. आरोपी आणि त्या महिलेचा पती एकाच ऑफिसमध्ये कामाला आहेत. आरोपी हा त्या महिलेच्या पतीचा वरिष्ठ अधिकारी आहे.

मागच्या काही दिवसांपासून आरोपीने पतीचं प्रमोशन न करण्याची भीती दाखवत एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीने २०१९ ते ११ मार्च २०२१ पर्यंत अनेकदा त्या महिलेवर बलात्कार केला आहे. यानंतर त्या महिलेने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.