Sunday, April 2, 2023

धक्कादायक ! 7 वर्षाच्या चिमुकलीला वडिलांकडून बेदम मारहाण

- Advertisement -

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील ताडीवला रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अभ्यास करत नसल्यावरून 7 वर्षांच्या चिमुकलीला वडिलांनी लाटण्याने व पोळपाटण्याने बेदम मारहाण केली आहे. यामुळे पोलिसांनी या पीडितेच्या वडिलांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नागेश महादेव जाधव असे आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेजारी राहणाऱ्या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण
नागेश जाधव हा मिळेल ते कामे करतो. त्याला 7 वर्षांची मुलगी आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास मुलीला अभ्यास का करत नाही असे विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ एवढा वाढला कि मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आणि नागेश याच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारील लोक जागे झाले. त्यावेळी नागेश हा आपल्या मुलीला पोळपाट आणि बेलण्याने बेदम मारहाण करत होता.

- Advertisement -

यानंतर शेजारच्यांनी मुलीला त्या मुलीला वडिलांच्या तावडीतून सोडवले. तरीदेखील तो अभ्यासच का करत नाही म्हणून मुलीला मारहाण करत होता. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागेश याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.