हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या आगीच्या घटनांमध्ये विलक्षण वाढ होत आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जुन्या बाजारातील इलेक्ट्रॉनिक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. ला यश आलं आहे.
पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात असंख्य घरे असल्याने आज पहाटेच्या सुमारास या ठिकाणी भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात दलास यश आले. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग pic.twitter.com/i2izNHXhgQ
— santosh gurav (@santosh29590931) January 18, 2023
आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. दुकानांच्या शेजारी मोठी वसाहत असल्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दहा ते बारा दुकानं आणि झोपडपट्टीतील काही घरे जळून खाक झाली आहे.