गुंडांचा हैदोस ! पुण्यामध्ये फुकट भाजी न दिल्याने तरुणाला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये काही गुंडे हातात हत्यारे घेऊन दहशत माजवत आहेत. अशीच काही घटना धनकवडी परिसरात घडली आहे. यामध्ये गुंडांनी फुकट भाजी दिली नाही, म्हणून भाजीवाल्याला पाया पडायला लावले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन गुंडांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. धनकवडी भागात बालाजी नगर येथील रजनी कॉर्नरजवळ हा संतापजनक प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण?
या घटनेमध्ये एका भाजी विक्रेत्याने फुकट भाजी दिली नाही, म्हणून भाजीवाल्याला त्याच्या आईसमोरच कपडे फाटेस्तोवर मारहाण करत पाया पडायला लावले. बालाजी नगरमधील गुलमोहर अपार्टमेंटसमोर हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

कोयते दाखवून दहशत माजवली
पुण्यामध्ये अशा घटना वारंवार घडत असतात. अनेकदा ही टोळी हातात कोयते घेऊन दहशत माजवताना दिसते. या व्हिडिओच्या आधारे पोलीस मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेऊन तक्रार दाखल करणार आहेत. या प्रकारामुळे पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला नाही का ? असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.