टीम, HELLO महाराष्ट्र। राज्यातील विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता पुणे जिल्ह्याती; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज झाले असून, त्या अनुषंगाने आतापासूनच प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.
हे प्रभाग रचनेचे काम जलदगतीने करून 30 डिसेंबर २०१९ पर्यंत प्रभाग रचना निश्चित करण्यात याव्यात अशा सूचनानिवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ४०० ग्रामपंचायती आहेत. त्यापकी निम्म्या म्हणजे ७०० ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत संपणार असून, त्यांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात अली आहे. त्यामुळे संबधित गावच्या तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळपाहणी करून प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणुक आयोगाने दिल्या आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रभाग रचना करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे-
हवेली 55 ग्रामपंचायती, आंबेगामधील 30, बारामतीमधील 49 ग्रामपंचायती, भोरमधील 74, दौंडमधील 50, इंदापूरमधील 61, जुन्नरमधील 67, मावळमधील 57, मुळशीमधील 45 ग्रामपंचायती, पुरंदरमधील 66, खेडमधील 91, शिरूरमधील 73 ग्रामपंचायती आणि वेल्हेमधील 31 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू आहे.