तृतियपंथीयांच्या वेशात दरोडेखोर; पुणे-हटीया रेल्वेत पैसे वसूल करण्यासाठी प्रवाशांना बेदम मारहाण

Pune Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-हटीया एक्सप्रेसमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक वाजायच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये तृतियपंथीयांच्या वेशात रेल्वेत आलेल्या दरोडेखोरांनी तब्बल 30 ते 40 प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडून पाचशे रुपये वसूल केले आहेत. याप्रकरणी आता फिर्यादी राजेशकुमार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे-हटीया एक्सप्रेसमध्ये गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारात वर्धा रेल्वे स्थानकावरून सहा लोक एक्सप्रेसमध्ये चढले. या एक्सप्रेसच्या एका डब्यात सत्तर प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये फिर्यादी राजेश कुमार प्रवास करीत होता. वर्धा रेल्वे स्थानकावरून डब्यात चढलेले सर्वजण तृतियपंथीयांच्या वेशभूषेत होते. काही वेळा मध्येच गाडी सुरू झाल्यानंतर तृतियपंथीयांनी जनरल बोगीत प्रवेश केला. या तृतियपंथीयांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच प्रवाशांना पाचशे रुपये मागितले. ज्या प्रवाशांनी पैसे दिले नाहीत त्यांना आणखीन मारहाण केली. या तृतियपंथीयांनी 30 ते 40 प्रवाशांकडून पाचशे रुपये वसूल केले. यानंतर अजनी स्टेशन येण्यापूर्वी गाडीची गती कमी झाल्यास सहाही तृतियपंथी पळून गेले.

दरम्यान, एका प्रवाशाने सर्व घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे एक्सप्रेस स्थानकावर येण्यापूर्वी त्याठिकाणी आरपीएफ जवान आले होते. त्यांनी प्रवाशांची चौकशी करून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीचा व्हिडिओ शूट केला. याबरोबर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून तृतियपंथीयांच्या वेशात आलेल्या दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले. सध्या पोलीस इतर दरोडेखोरांचा तपास करीत आहेत.