Pune Kolhapur Highway : पुणे – कोल्हापूर हायवे कधी पूर्ण होणार? संसदेत गडकरींची मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Kolhapur Highway। पुणे ते कोल्हापूर हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा व्यापून घेणाऱ्या कोल्हापूर पुणे महामार्गाचे काम मागील ३ वर्षांपासून सुरु आहे. कामात बऱ्यापैकी प्रगती असली तरी अजूनही या महत्वाच्या महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण झालेलं नाही. आजही अनेक ठिकाणी रस्ते वळवण्यात येत आहेत. तसेच रस्त्यांची कामे सुरु असल्याने अपघाताच्या घटनांनी सातत्याने घडताना दिसत आहेत. या एकूण संपूर्ण पार्श्वभूमीवर लोकसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना सवाल केला असता, गडकरींनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर केली, तसेच हा गेमचेंजर महामार्ग कधी पूर्ण होणार हे सुद्धा सांगून टाकलं.

काय म्हणाले नितीन गडकरी ? Pune Kolhapur Highway

केंद्र सरकारने पुणे ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गाचे नवीन सर्वेक्षण केले आहे. रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या समस्या सोडवण्यासाठी लवकरच महामार्गावर ६,००० कोटी रुपयांचे काम हाती घेतले जाईल. खंबाटकी घाटावर एक नवीन बोगदा बांधण्यात येत आहे आणि लवकरच एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाईल, यामुळे पुणे आणि सातारा दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल, असे गडकरी यांनी म्हंटल. बेंगळुरूकडे जाणाऱ्या सातारा-कोल्हापूर मार्गाचे काम सुरू आहे, तसेच काही तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्या आहेत. पुणे-कोल्हापूर महामार्गाची स्थिती (Pune Kolhapur Highway) एका वर्षात लक्षणीयरीत्या सुधारेल, आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.

दरम्यान, मुंबई-बेंगळुरू बायपासवरील महामार्गावरील नवले पुलावर अपघात होत असल्याचे सुळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. “केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. अपघातांची संख्या कमी झाली आहे, परंतु अलीकडेच एक जीवघेणा अपघात झाला आहे. अपघाताचे हे प्रमाण शून्य टक्क्यावर कसं आणता येईल याची आपल्याला गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रश्नात म्हंटल होते.