हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक म्हणजे पुणे हा मतदारसंघ (Pune Lok Sabha 2024) ओळखला जातो. उच्चशिक्षित लोकांचा मतदारसंघ म्हणूनही पुणे मतदारसंघ गणला जातो त्यामुळे राजकीय सत्ताकेंद्रात पुणे लोकसभा मतदारसंघाला महत्वाचे स्थान आहे. आत्तापर्यंत आपण पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर काँग्रेस आणि भाजपचे आलटून पालटून वर्चस्व पाहायला मिळते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट मोठ्या मताधिक्याने पुण्यातून विजयी झाले होते, मात्र त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर पुणे भाजपमध्ये एक पोकळी निर्माण झाली . तीच पोकळी भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डबल स्ट्रोक मारला आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून युवा नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) याना भाजपने पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर त्यांच्या समोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात आहेत. अशावेळी भाजप आपला गड राखणार का? कि धंगेकर पुन्हा एकदा जायंट किलर ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. पुणे लोकसभेचे राजकारण नेमकं काय आहे तेच आज आपण या विडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.. नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय मंथन ..
सर्वात आधी जाणून घेऊयात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचयाबद्दल.. मुरलीधर मोहोळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले आहेत. आधी पुण्याचे नगरसेवक आणि नंतर थेट महापौर अशा दोन्ही जबाबदाऱ्या मोहोळ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निभावल्या.. महापौरपदी असताना त्यांनी पुण्याच्या विकासात मोठी भर घातली. याच कामाची पोचपावती देत भाजपने मुरलीधर मोहोळ याना थेट पुणे लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले. महापौर म्हणून काम करत असताना मुरलीधर मोहोळ यांनी आपला जनसंपर्क वाढवला. पुण्यातील सर्व घटकांपर्यंत पोहचलेले उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी असलेली संघाची ताकद, देवेंद्र फडणवीस यांची साथ, भाजपची पुणे महानगर पालिकीतील सत्ता, बापट कुटुंबाचा आशीर्वाद आणि महत्वाची बाब म्हणजे मेधा कुलकर्णी याना राज्यसभेत पाठवल्याने दूर झालेली ब्राह्मण समाजाची नाराजी या सर्व कारणांमुळे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक सोप्पी जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात उभे असलेले रवींद्र धंगेकर हे सुद्धा विजयाची आशा बाळगून आहेत. भाजपाचा २५ वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा धूळ चारत धंगेकर जॉईंट किलर ठरले होते. शरद पवारांचा भक्कम पाठिंबा, दांडगा जनसंपर्क आणि दलित मुस्लिम व मराठा समाजाची मते यावर धंगेकरांची मदार असेल. मात्र मनसेतून बाहेर पडलेल्या आणि खासदार होण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या वसंत मोरे यांच्यामुळे धंगेकरांना मोठा फटका बसू शकतो. वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती तसेच मराठा समाजाच्या बैठकीत सुद्धा ते उपस्थित होते. अशावेळी जर वसंत मोरे यांनी दलित + मराठा मते स्वतःकडे खेचली तर धंगेकर विजयापासून कोसो दूर लांब जातील आणि याचा आपोआप फायदा मुरलीधर मोहोळ यांनाच होईल हे वेगळं सांगायला नको..
पुणे लोकसभा मतदारसंघाचे राजकीय गणित सांगायचं झाल्यास, एकूण ६ विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे ४, काँग्रेसचा १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आमदार आहे. यामध्ये शिवाजीनगरचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील, पर्वतीमध्ये माधुरी मिसळ आणि पुणे कँटोनमेन्ट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे सुनील कांबळे करतात तर वडगाव शेरी मध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि कसबा पेठ मध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार आहेत. त्यामुळे कागदावर सुद्धा मुरलीधर मोहोळ यांचेच पारडं जड वाटतंय.. .. मोदींचे विकासात्मक राजकारण, त्याला राज्यातील महायुतीची जोड.. .. आणि जनमानसात मुरलीधर मोहोळ यांची पडलेली छाप यामुळे भाजप पुण्याचा आपला बालेकिल्ला आणखी मजबूत करणार? कि रवींद्र धंगेकर कसब्यानंतर भाजपचा पुणे लोकसभेच्या निमित्ताने दुसरा झटका देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे.