पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने मुलांचा अभ्यास ऑनलाईन पद्दतीने घेतला जात आहे. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असताना मोठ्या आवाजात टीव्ही आणि सिस्टम का लावला असा जाब विचारला असता ४ जणांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना रविवारी रात्री धनकवडीतील शांतीनगर वसाहत येथे घडली आहे. या संदर्भात महादेव अडसूळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
काय आहे प्रकरण
सध्या कोरोनच्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. तक्रारदार यांच्या मुलांचे सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन शिक्षण सुरू होते. तेव्हा त्यांच्या जवळच राहणाऱ्या ओळखीतील आरोपीने घरातील टीव्ही व साऊंड सिस्टमचा खूप मोठा आवाज केला. त्यामुळे तक्रारदार यांच्या मुलांना त्याचा त्रास होत होता. याबाबत विचारणा केली असता तक्रारदार आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता.
याचाच राग मनात धरून आरोपींने अडसूळ यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपीने अडसूळ यांच्यावर कोयत्याने डोक्यात व हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा हल्ल्यात अडसूळ गंभीर जखमी झाले. हे भांडण जेव्हा सुरु होते तेव्हा सोडवायला आलेल्या अडसूळ यांच्या पत्नी मावशी, मावसभाऊ यांना देखील आरोपींनी जबर मारहाण करत त्यांनी जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास सहायक निरीक्षक किरण मदने करत आहेत.