दुर्दैवी ! शाळेत डबा खाण्यापूर्वी हात धुवायला गेलेल्या शिक्षिकेचा सर्पदंशाने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेचा सर्पदंशाने (snake bite) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्पदंश झाल्यानंतर या शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते मात्र अखेर तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. पद्मा केदारी असं मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
मृत पद्मा केदारी या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील बावधन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. घटनेच्या वेळी त्या दुपारच्या सुमारास जेवणाचा डबा खाण्याआधी हात धुण्यासाठी गेल्या यावेळी त्यांना सर्पाने दंश (snake bite) केला. पद्मा केदारी यांच्या दोन बोटांना विषारी सापाने (snake bite) लक्ष्य केलं. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पद्मा केदारी यांच्या शरीरात विष गंभीर परिणाम करु लागलं होतं. खासगी रुग्णालयात पद्मा यांचा जीव वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना त्यामध्ये अपयश आले. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ (snake bite) व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..