हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनामुळे जमावबंदी जाहीर करण्यात आली असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीएमपीएल सेवा केली बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज संध्याकाळी ५ वाजल्यानंतर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक करणारी PMPML बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर पीएमपीएल बस सेवा सुरु होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा करूनही बंदचे आदेश न निघाल्याने महापौरांनी PMPML मुख्यालय गाठले. दरम्यान, महापौर मोहोळ यांनी PMPMLच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना शहरातील बस सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज संध्याकाळी ६ वाजल्यानंतर PMPML बस प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. मात्र, राज्य सरकारच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक सेवेपुरत्याच PMPMLच्या बस उपलब्ध होणार आहेत.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.