हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे मेट्रो (Pune Metro) पुणेकरांच्या पसंतीस पडत असून तिचा आनंद घेण्यासाठी पुणेकर मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे इथे गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. मेट्रोचे स्टेशन हे अत्यंत सुंदर बनवल्यामुळे येथील काही नागरिक केवळ बसण्यासाठी येथे येतात. त्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मेट्रोन एक नियमावलीच बनवलीये. कशी आहे नियमावली ते जाणून घेऊयात.
काय आहेत नवीन नियम?
पुणे मेट्रो स्थानकात काही नागरिक विनाप्रवासाचे येऊन बसतात. त्यामुळे होणारी गर्दी ही इतर प्रवाश्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी मेट्रोने आता नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये आता मेट्रो प्रवास करण्यासाठी प्रवाश्यानी 20 मिनिटात आपला प्रवास सुरु करावा आणि सोबतच प्रवासाचे तिकीट काढून 90 मिनिटात प्रवास पूर्ण करून स्थानकाच्या बाहेर येण्याचा नियम लागू केला आहे. तसेच एकदा प्रवाश्याने तिकीट काढल्यानंतर 90 मिनिटाचा वेळ झाल्यावर तुमचे तिकीट स्कॅन करून मेट्रोचे बाहेर जाण्याचे गेट बंद केले जाईल असा नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासूनच लागू करण्यात आला आहे.
का लागू करण्यात आला नियम? Pune Metro
मेट्रो स्थानकात (Pune Metro) काही नागरिक तिकीट काढून स्थानकात बसतात. मात्र प्रवास करत नाहीत. त्यामुळे इतर प्रवाश्यांना बसण्यासाठी जागा राहत नसल्यामुळे प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो. त्याबाबतीत तक्रार समोर आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पुण्यातच नव्हे तर हा नियम देशातील इतर मेट्रो स्थानकातही लागू करण्यात आला आहे.
सध्या मेट्रोत 60 ते 65 हजार प्रवासी करतात प्रवास
पुणे मेट्रोची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. मेट्रोमध्ये मिळणारी सुविधा आणि ट्राफिकच्या झणझटीपासून मिळणारी मुक्तता ह्यामुळे मेट्रोचा वापर अनेक जण करताना दिसून येत आहेत. सध्या मेट्रोन प्रवास करणारे पुणेकर हे 60 ते 65 हजार एवढे आहेत.
आता मेट्रोमध्ये मिळणार विकेंडला 30 टक्के सूट
दरम्यान, मेट्रोचा आनंद घेण्यासाठी आणि तो सामान्य लोकांना परवडण्यासाठी मेट्रोने विकेंडला प्रवासात 30 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या निर्णयाचा उद्देश हा प्रवास सुखकर आणि परवडणारा व्हावा ह्यासाठी सर्व नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा असा आहे.