पुणे प्रतिनिधी | आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय ते येरवडा या मेट्रो टप्प्यांवरील प्रवाशांना येत्या जूनपासून मेट्रोतून प्रवास करता येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या टप्प्यांतील प्रत्येकी पाच किलोमीटरचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. यापूर्वी पुण्यात डिसेंबरमध्ये मेट्रो धावेल, असा दावा करण्यात आला होता.
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावेळी महापौर मोहोळ यांना दिली. त्यानुसार महापौर म्हणाले, ८० ते ८५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा प्रकल्प-आराखडा महामेट्रो तयार करीत असून, वनाझ ते नियोजित शिवसृष्टीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल. यावेळी शहरातील विविध प्रकल्पांच्या कार्याचा आढावा महापौरांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या –
एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर – शरद पवार
फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती
अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता – शरद पवार
भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल
उपमुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय शरद पवार घेतील – अजित पवार