पुणे | स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांचा कायापालट करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे मेट्रो कामाला आता गती मिळाली आहे. शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने पुणेकरांना मात्र वाहतुक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचाच प्रत्यय आज कर्वे पुतळ्यापासून वर्तुळाकार मार्ग सुरु केल्यामुळे आला.
संध्याकाळी एसएनडीटी पासून वाहन वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस तैनात करून बेरिकेड्स लावण्यात आले आहेत. वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पुणे मेट्रो च्या प्रस्तावावर गंभीर चर्चा झाली होती. त्याचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं.
पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असा मेट्रो चा मार्ग असणार आहे असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं परंतु वाढतं शहरीकरण लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा मार्ग फुरसुंगी पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.