हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांनो, हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. रविवारी दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असून सर्वत्र तयारी सुरु आहे. दिवाळीनिमित्त अनेकजण खरेदीसाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना मेट्रोचा (Pune Metro) वापर करत आहेत. परंतु दिवाळीनिमित्त पाहल्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला पुणे मेट्रोने वेळेत बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करत असताना वेळ पाहूनच करावा. येणाऱ्या रविवारी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रवाश्यांसाठी मेट्रोच्या रोजच्या वेळेपेक्षा कमी म्हणजेच 12 तास मेट्रो धावणार आहे. कसे असेल मेट्रोचे वेळापत्रक ते जाणून घेऊयात.
सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धावेल ट्रेन- Pune Metro
पुणेकरांना जेव्हापासून मेट्रो (Pune Metro) मिळाली आहे तेव्हापासून पुणेकर मेट्रोचा अधिक वापर करताना दिसून येतात. रोज अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी प्रवास करतात. यामुळे पुणे मेट्रोने ट्विट करत 12 तारखेला सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत मेट्रो चालवण्याची माहिती दिली आहे. सर्व प्रवाश्यांनी या नवीन वेळेबद्दल जाणून घ्यावे असे मेट्रो कडून आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून कोणत्याही प्रवश्याची फजिती होऊ नये.
सोमवारी होणार मेट्रो सुरळीत
दिवाळीसाठी म्हणजेच एकाच दिवसासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार पासून मेट्रो तिच्या पूर्व वेळेत सुरु राहील. याचीही प्रवाश्यांनी दखल घ्यावी असेही आवाहन मेट्रो कडून करण्यात आले आहे. पुणे मेट्रोचा टाइम हा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतो. हीच वेळ दुसऱ्या दिवशीपासून सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे.