Pune Mumbai Train Cancelled : मुंबई- पुणेदरम्यान सर्व ट्रेन रद्द; पावसामुळे रेल्वेचा निर्णय

Pune Mumbai Train Cancelled
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Mumbai Train Cancelled । पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि रेल्वे ट्रॅक वर पाणी साचल्याने मुंबई- पुणे दरम्यान सुरु असलेल्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हीही जर पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणार असाल तर इतर वाहनांचा विचार करावा. रेल्वे विभागाकडून कोणकोणत्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती आपण जाणून घेऊयात.

खरं तर गेल्या ३ दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. खास करून मुंबईत तर पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी आहे. मुंबईतील अनेक लोकल सेवांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबईतील पावसाच्या या अवस्थेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या रद्द (Pune Mumbai Train Cancelled) करण्यात आल्या आहेत. यामध्ये डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस जालना-मुंबई जन शताब्दी यांचा समावेश आहे.

आज रद्द करण्यात आलेल्या ट्रेनची यादी – Pune Mumbai Train Cancelled

११०१०: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

११००७: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस

१२१२८: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस

२२१०६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस

१२१२६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

१२१२४: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

२२२२६: वंदे भारत एक्सप्रेस

काल मुंबईहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या सुद्धा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईतील मुसळधार पावसामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. तस बघितलं तर मुंबई आणि पुणे हि दोन्ही शहरे महाराष्ट्रातील आघाडीची शहरे आहेत. दोन्ही ठिकाणी लोक नोकरीच्या शोधात जातात. मुंबईतून पुण्याला कामानिमित्त ये जा करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्त आहे. अशा प्रवाशांना या ट्रेन रद्द झाल्याने मोठा फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून हवामानाचा अंदाज घेऊन पुढील काही दिवस ट्रेनबाबात वेळोवेळी माहिती अपडेट्स देण्यात येणार आहे. प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी रेल्वेची अपडेटेड माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.