व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात शिवसेनेला खिंडार; मोठा नेता शिंदे गटात सामील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला आहे. पुण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असून पुण्याचे नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाना भानगिरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढली आहे.

नाना भागिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे. येवडच नव्हे तर त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती.  त्यामुळे नाना भगिरे यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता स्थानिक पातळीवरील नेतेही एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊ लागले आहेत. आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना अजून धक्का पे धक्का बसत आहे.