Pune News : पर्यटकांनो जरा जपून! सिंहगड किल्ल्याजवळ आढळून आला बिबट्या

Pune News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune News : महाराष्ट्रातील पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) जवळील भागात बिबट्या आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे वनविभागाने किल्ला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अलर्ट जारी केला आहे. हा बिबट्या किल्ल्याच्या कल्याण दरवाजाजवळ आला असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी साडे सहाच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या जवळ असणाऱ्या मोरदरी गावात काही स्थानिकांना बिबट्या दिसला.

यानंतर बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी त्वरित वनसंपर्क विभागाला (Forest Department) कळवली. यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला पकडण्याचा बंदोबस्त केला. अद्याप हा बिबट्या वनविभागाच्या हाती लागला नसून तो जवळील जंगलात शिरला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. दरम्यान सिंहगड किल्ल्यावरून रोज हजारो पर्यटक ये जा करत असतात. मात्र आता या ठिकाणी जाताना पर्यटकांना (Tourist) काळजी घ्यावी लागणार आहे.

सिंहगड किल्ल्याच्या जवळच असणाऱ्या गावात बिबट्या दिसल्यामुळे पर्यटकांच्या मनात देखील भीती बसली आहे. यापूर्वी देखील आपण गावात बिबट्या आल्याच्या घटना ऐकल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आता हीच भीती पुणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे. सिंहगड किल्ला हा पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक लांबून येत असतात. तर तरुण मंडळी देखील ट्रेकिंगसाठी सिंहगड (Sinhagad Trecking) किल्ल्यावर येत असतात. सिंहगड किल्ल्याला पुण्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून पाहिले जाते. आता याच किल्ल्यावर जाण्यासाठी नागरिकांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.