पुणे | भारतात कोरोनाचा कहर काही कमी होताना दिसत नाही.त्देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच चिंतेची बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रतील दोन महत्वाचे शहर मुंबई आणि पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारी अग्रस्थानी असलेल्या मुंबईला मागे ढकलत पुण्यांना अव्वल स्थान काबिज केले आहे.
मधल्या काळात राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील अनेक उद्योगधंदे शिथिलता देऊन सुरु करण्यात येत आहेत. त्याचमुळे राज्यातील नागरिकांची अशी चुकीची धारणा झाली आहे कि कोरोनाचे संकट टळले आहे आणि त्यांनी मास्कचा वापर करणेच सोडले आहे. पण पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात मास्क अनिवार्य असून त्याचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारण्याबाबतचा विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथे आटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्धाटन झाले. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर उषा ढोरे, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’